प्रतिष्ठा न्यूज

नव्याने डांबरीकरणं केलेल्या तासगाव कवठे एकंद रस्त्याची दुरावस्था सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव कवठे एकंद अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सुमारे शंभर भर लहान मोठे खड्डे पडले आहेत, lत्यामुळे या प्रमुख मार्गावरील दुचाकी वाहकांना मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे अपघातचे प्रमाण वाढत आहे.या रस्त्यावर नव्याने डांबरीकरण होवूनही खड्डे पडल्याने ठेकेदाराने केलेल्या कामाबद्दल नागरिकांतून उलट सुलट चर्चा सुरु आहेत.डाव्या बाजूला प्रामुख्याने दुचाकी चालविण्याच्या मार्गात जागोजागी खड्डे पडले आहेत. खड्डे चुकविण्यासाठी वाहकांना कसरत करावी लागते परंतु मागून येणाऱ्या चार चाकी किंवा भरधाव इतर वाहन चालवणाराची धांदल उडते.गेल्या काही दिवसात खड्डा चुकविण्यासाठी मागून येणाऱ्या वाहनांच्या आडवे जावून लहान मोठे अपघात झाले आहेत.या
परिसरात कोल्ड स्टोअरेज व अन्य व्यवसाय असल्याने चार चाकी वाहनांची वर्दळ अधिक असते.सकाळ सत्रात कामगार व शाळा सुरू ,कॉलेजचे विद्यार्थी याची दुचाकीवरून वर्दळही अधिक असते. यामुळे खड्डेमय रस्तामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
अपघातात वाढ:जागोजागी खड्डे असल्याने दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना अधिक अपघातांना सामोरे जावे लागत आहे.रस्त्यावर नव्याने आलेल्या वाहकांची अचानक येणाऱ्या खड्डयामुळे फजितीच होते. काही ठिकाणी एक फूटाचे खोल खड्डे आहेत.त्यामुळे अपघातात वाढ झाली आहे.खराब रस्त्यावरून जाताना हादऱ्यामुळे महिला गाडीवरून पडल्याने जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे परिसरात वाहतूक असुरक्षित बनली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.