प्रतिष्ठा न्यूज

डॉ. सचिन पाटील उमरेकर यांची- महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अधिसभा (सिनेट) सदस्य म्हणून निवड

प्रतिष्ठा न्यूज / वसंत सिरसाट
 उमरा : महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अधिसभा (सिनेट) सदस्य म्हणून डॉ.सचिन पाटील उमरेकर यांची निवड करण्यात आली.
राज्याचे राज्यपाल तथा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे यांनी महाराष्ट्रातील एकूण 6 जणांची अधिसभा (सिनेट) सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. मराठवाडा या विभागतून नांदेड येथील उमरेकर मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा तथा भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक शहरातील प्रसिद्ध अस्थीरोग तज्ञ डॉ. सचिन संभाजी पाटील उमरेकर यांची महाराष्ट्र राज्य राज्यपाल -आरोग्य विज्ञान विद्यापीठावर अधिसभा ( सिनेट) सदस्य  म्हणून निवड करण्यात आली आहे.
या बाबतचे पत्र नुकतेच त्यांना प्राप्त झाले आहे
डॉ. सचिन पाटील उमरेकर हे गेल्या 20 वर्षा पासून विविध उपक्रमाच्या माध्यमातून व आरोग्य शिबिरांचे आयोजन करून शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर, गरिबांची आरोग्य सेवा करत असल्याने त्यांची शासन दरबारी दख्खल घेण्यात आली असल्याने त्यांची ही निवडी झाली आहे. या निवडीबद्दल जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, यांच्यासह भाजपाचे जिल्ह्यातील आमदार, सर्व पदाधिकारी, डॉक्टर व उमरा येथील गावकऱ्यांनी  आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.