प्रतिष्ठा न्यूज

तासगाव होमगार्ड पथकाचा पदोन्नती समारंभ संपन्न…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : गृहरक्षक दलाच्या जवानांनी(होमगार्ड )व्यसनाधीनते पासून दूर राहून निष्काम भावनेने करत असलेले काम पुढे सातत्याने करीत राहावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा गृहरक्षक दलाचे केंद्रनायक महेंद्र चौधरी यांनी केले.तासगाव तालुका गृहरक्षक दलाच्या(होमगार्ड )पदोन्नती समारंभात प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी जिल्हा कार्यालयाचे सर्जेराव पाटील,लिंबाजी कांबळे,तासगाव तालुका होमगार्डचे माजी प्रभारी तालुका समादेशक रामकृष्ण काळे, विलास सावंत,ग.म.गव्हाणकर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय भाषणात दिलीप जोगळेकर म्हणाले, गृहरक्षक दलातील जवान प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात.काही वर्षांपूर्वी तासगाव पथकातील रवींद्र दळवी व अशोक बनसवडे यांनी विहिरीत अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.पदोन्नती समारंभा दरम्यान तासगावचे प्रभारी अधिकारी अविनाश परळे यांना वरिष्ठ पलटण नायक,रवींद्र दळवी -पलटण नायक,बाळासो कांबळे- पलटण नायक अशी पदोन्नती देण्यात आली तर एन.सी.ओ पदी अरविंद मोराळकर,अशोक बनसवडे,योगेश पाटील, राजू ढेकणे,अजय एडके, सुरज चव्हाण,हणमंत शिंदे,मोसिन मुल्ला,जावेद मेवेकरी आदींना बढती देण्यात आली.माजी प्रभारी अधिकारी डी. के. माळी यांचा सेवानिवृत्ती सत्कार यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाचे नियोजन सुरेश साळुंखे, सुरेश कदम आदी जवानांनी केले. यावेळी सर्व पदाधिकारी व होमगार्ड मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.