प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्याचे जिल्हाधिकारी- अभिजित राऊत यांचे आवाहन

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : जिल्ह्यात दि.19 फेबुवारी 2024 रोजी साजरी करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्यभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होण्याच्या मुहूर्तावर या वर्षीची शिवजयंती उत्साहात साजरी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी- मा.अभिजीत राऊत यांनी केले आहे.
त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 5 फेब्रुवारी 2024 रोजी परिपत्रक निर्गमित केले आहे. या परिपत्रकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने दि. 19 फेब्रुवारी 2024 रोजी विविध उपक्रमा संदर्भात करावयाच्या आयोजना बाबत निर्देश दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी शासकीय, निमशासकीय कार्यालयात जयंती निमित्त विविध उपक्रम आयोजित करावेत. तसेच ग्रामपंचायत, नगरपंचायत, महापालिका, महानगरपालिका स्तरावर व विविध संस्थांमध्ये हा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात यावा तसेच शिवरायांचा पुतळा ज्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात यावी. छत्रपतींच्या प्रेरणादायी जीवन चरित्रावर आधारित विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन करावे, या संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी- मा.अभिजित राऊत यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.