प्रतिष्ठा न्यूज

गोवर्गीय पशुधनात लंपी चर्मरोगामुळे “बैल पोळा” रद्द – घरीच पशुधनाची पूजा करावी- जिल्हाधिकारी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील एकूण 16 तालुक्यातील 197 ईपीसेंटर मध्ये गोवर्गीय पशुधन लंपी चर्मरोग ( Lumpy Skin Disease ) या सांसर्गिक रोगाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे तसेच गोवर्गीय पशुधनामध्ये मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने दिनांक 14 सप्टेंबर 2023 रोजी “बैल पोळा” या सणानिमित्त गोवर्गीय पशुधन मोठया संख्येने एकत्रित येत असल्याने जिल्ह्यातील इतर निरोगी पशुधनास लंपी चर्मरोग (Lumpy Skin Disease) या सांसर्गिक रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअर्थी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नांदेड यांनी प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 नुसार त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील गोवर्गीय पशुधनाचे “बैल पोळा” सणानिमित्त एकत्रित येण्यास सक्त मनाई आदेश देण्यात आले आहेत. तसेच जिल्हयातील सर्व पशुपालक व शेतकरी यांनी घरगुती स्वरुपात “बैल पोळा” सण पूजा करून साजरा करावा.
असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी मा. अभिजित राऊत यांनी एका पत्रकाद्वारे जिल्ह्यातील जनतेला केल आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.