प्रतिष्ठा न्यूज

कापसी बु. च्या महिला उपसरपंच अपात्र- पुढील न्यायासाठी अपील करणार

प्रतिष्ठा न्यूज / वसंतराव सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील कापसी बु. येथील उपसरपंच- शोभाबाई एकनाथ वडवळे यांचे अपील जिल्हाधिकारी यांनी फेटाळले असून उपसरपंच यांच्या विरुध्द दाखल केलेल्या अविश्वास ठराव वैध असल्याचे त्यात म्हटले आहे. दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाच्या विरोधात आपण न्याय मागण्यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचे वडवळे यांनी सांगितले आहे.
कापसी बु. येथील उपसरपंच- शोभाबाई एकनाथ वडवळे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीच्या 7 सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. लोहा येथील तत्कालीन तहसीलदार- व्यंकटेश मुंडे यांनी दि. 8 जून 2023 रोजी ग्रामपंचायतींची विशेष सभा बोलावून अविश्वास ठरावावर चर्चा करुन ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेतले होते. सदर सभेत शोभाबाई वडवळे यांच्या विरुद्ध 7 विरुद्ध 1 अशा मताने अविश्वास ठराव मंजूर झाला होता. कापसी बु. येथील सरपंच- ललिता आळणे व सदस्यांनी पारीत केलेल्याअविश्वास ठरावाच्या विरोधात वडवळे यांनी अपील दाखल करुन अविश्वास प्रस्ताव नियमबाह्य असल्याचे अपीलात म्हटले होते. या प्रकरणाचा निकाल दि.16 नोव्हेंबर 2023 रोजी लागला आहे.शोभाबाई एकनाथ वडवळे यांच्या वतीने अॅड. मिलिंद एकताटे तर ग्रामपंचायतीच्या वतीने ॲड. पुजारी यांनी म्हणणे मांडले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.