प्रतिष्ठा न्यूज

कर्मवीर पतसंस्थेत मनोहर सारडा व रावसाहेब पाटील यांचा झिंदाबाद पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रतिष्ठा न्यूज तर्फे झिंदाबाद सहकार भूषण पुरस्कार रावसाहेब पाटील यांना तर झिंदाबाद उद्योग भूषण पुरस्कार मनोहर सारडा यांना मिळाल्याबद्दल कर्मवीर पतसंस्थेतर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोहर सारडा म्हणाले कर्मवीर पतसंस्था ही एक आदर्श पतसंस्था आहे या वास्तूमध्ये प्रवेश केल्याबरोबर वास्तूच सांगते या संस्थेचे वैभव ही संस्था नजीकच्या काळात 2000 कोटी ठेवीचे उद्देश पूर्ण करेल.

यावेळी संस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील मनोगतात म्हणाले मनोहर सारडा उत्तम व्यापार करतात तसेच व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करतात त्यांना कर्मवीर उ‌द्योग भूषण ही आम्ही डॉ मशालकर सरांच्या हस्ते दिला होता मला मिळालेला सहकार भूषण पुरस्कार कर्मवीर पतसंस्थेमुळे मिळाला आहे त्यामुळे हा पुरस्कार मी कर्मवीर पतसंस्थेलाच देत आहे.

यावेळी एड. एसपी मगदूम यांनी मनोहर सारडा तर रावसाहेब पाटील यांचा डॉ. अशोक सकळे यांनी सत्कार केला.
यावेळी डॉ. रमेश ढबू वसंतराव नवले, ए के नाना चौगुले, डॉ नरेंद्र खाडे, श्रीमती भारती चोपडे, लालासो थोटे, डॉ मोटके पाटील, डॉ चेतन पाटील, जिव्हाळा ग्रुपचे आर बी पाटील, लक्ष्मण नवलाई, विजय तेली, प्रमोद लाड, शितल पाटील, रमाकांत घोडके, सुतार साहेब सर्व कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.