प्रतिष्ठा न्यूज

माजी खासदार संजयकाका पाटील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले ; रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करून पूरग्रस्तांसाठी सांगली जिल्ह्यातील काही स्टेशनवर रेल्वे गाड्या थांबवण्याच्या प्रयत्नांना यश ; कुठे कोणत्या गाड्या थांबणार पहा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : माजी खासदार संजयकाका पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त विस्तारातील गावांमध्ये काही रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते त्या अनुषंगाने सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी या रेल्वे स्टेशनवर ज्या रेल्वे गाड्या थांबत नाहीत त्या गाड्यांना पुराच्या काळात तात्पुरता थांबा देण्याची विनंती रेल्वेमंत्री श्री अश्विनी वैष्णवना केली होती.
सांगली रेल्वे स्टेशनवर निजामुद्दीन-यशवंतपुर संपर्क क्रांति व चंडीगड-यशवंतपुर संपर्क क्रांति गाड्यांचा थांबा तसेच किर्लोस्करवाडी व भिलवडी येथे बेंगलोर-अजमेर एक्सप्रेस, बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस, बेंगलोर-जोधपुर एक्सप्रेस व मैसूर-अजमेर एक्सप्रेस या 5 गाड्यांचा थांबा द्यावा व ताकारी येथे महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेसला द्यावा ही विनंती माजी खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे होती.
त्या अनुषंगाने रेल्वे मंत्र्यांनी भिलवडी व किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवर बेंगलोर-अजमेर एक्सप्रेस, बेंगलोर-गांधीधाम एक्सप्रेस, बेंगलोर-जोधपुर एक्सप्रेस व मैसूर-अजमेर एक्सप्रेस या 5 रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.
तसेच ताकारी रेल्वे स्टेशनवर महाराष्ट्र एक्सप्रेस व कोयना एक्सप्रेस या 2 रेल्वे गाड्यांचा थांबा मंजूर केला आहे.
सांगलीत देखील दोन्ही संपर्क क्रांती या गाड्यांना पुरा परिस्थितीत तात्पुरता थांबा मिळण्यासाठी माजी खासदार प्रयत्न करत आहेत.
बऱ्याच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी येथे थांबा मिळाल्यामुळे पुरात सापडलेल्या पूरग्रस्त लोकांना महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व राजस्थान जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सांगली जिल्ह्यातील 3 रेल्वे स्थानकांवर ता 6 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवल्यामुळे सांगली जिल्ह्यातील रेल्वे प्रवासी संघटनांनी माजी खासदार श्री संजयकाकांचे आभार मानले आहेत.
प्रवाशांनी भिलवडी, किर्लोस्करवाडी व ताकारी या रेल्वे स्टेशन वर चौकशी करून या रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक व तिकीट काढण्यासाठी चौकशी करावी. तसेच जास्तीत जास्त लोकांनी जिल्ह्यातील 3 रेल्वे स्थानकांवर मिळालेल्या थांब्याचा फायदा घ्यावा व जास्तीत जास्त लोकांनी या रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करावा असे आवाहन माजी खासदार श्री संजयकाका पाटील यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.