प्रतिष्ठा न्यूज

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली मिरज कुपवाड मध्ये रक्तदान शिबिरे संपन्न

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त स्टेशन चौकातील आयुर्वेदिक दवाखान्यामध्ये रक्तदान शिबिर पार पडले.

महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक दवाखान्याच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीवनी घाडगे यांच्या प्रयत्नाने आणि शिरगावकर ब्लड बँक यांच्या मदतीने हे रक्तदान शिबिर पार पडले. या रक्तदान शिबिरामध्ये मलेरिया विभागाच्या ब्रिडिंग चेकरसह महापालिका कर्मचारी, नागरिक यांनी सहभाग घेतला होता. सांगली मिरज आणि कुपवाडमध्ये अशाप्रकारे रक्तदान शिबिर घेण्यात आले. महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी रक्तदान शिबिरांना भेटी देऊन माहिती घेतली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.