प्रतिष्ठा न्यूज

ढवळीत गायरान जमिनीमध्ये अवैध मुरूम उत्खनन : मनसेच्या अमोल काळे यांची कारवाईची मागणी

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : ढवळी गावामध्ये मोठ्या प्रमाणावर गायरान जमिन आहे. त्या जमिनीममधील मुरूम अवैधरीत्या उत्खनन करून बाहेर विकला जात आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी अशी मागणी ढवळी चे मनसे नेते अमोल काळे यांनी तहसीलदार यांना आज निवेदनाद्वारे केली आहे. तासगावच्या या व्यक्तीने सदर जमिनीमध्ये बेसुमार अवैध मुरूम उत्खनन केले आहे.
या व्यक्तीचे महसुल विभागाच्या बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या बरोबर अर्थिक लागेबांधे आहेत. त्यामुळे महसूल कर्मचारी (गाव कामगार तलाठी व मंडल अधिकारी) यांच्या कडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही. मुरूम उत्खनन करताना नियमाचे पालन केलेले नाही.तसेच महावितरणाच्या पोलच्या अगदी ५ ते १० फूट अंतरावर मुरूम उत्खनन करून बाहेर विकला आहे. तरी आपण याबाबत तातडीने पंचनामा करून संबंधितावर कारवाई करण्यात यावी अशी विनंती तहसीलदार यांना केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.