प्रतिष्ठा न्यूज

कुपवाड अमृत २.० ड्रेनेज योजनेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : कुपवाड अमृत २.० ड्रेनेज योजनेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सोलापूर येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
कुपवाड शहरासाठी महत्त्वाची असणाऱ्या कुपवाड ड्रेनेज योजनेच्या महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्याहस्ते सोलापूर येथे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी सोलापूर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
हा सोहळा पाहण्यासाठी कुपवाड येथे आयोजित कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, आयुक्त तथा प्रशासक श्री सुनील पवार,भाजपचे जेष्ठ नेते, माजी उपमहापौर शेखर इनामदार, भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजपा नेते प्रा. मोहन व्हनखंडे, माजी महापौर संगीता खोत, माजी सभापती धीरज सुर्यवंशी, भाजपा महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील, स्थानिक माजी नगरसेवक विष्णू माने, सोनाली सागरे, राजेंद्र कुंभार , कल्पना कोळेकर, सविता मदने, वहिदा नाईकवडी,
यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक आयुक्त तथा प्रशासक श्री . सुनील पवार यानी केले. कार्यक्रमाचे संयोजन उपायुक्त स्मृती पाटील, राहुल रोकडे, वैभव साबळे, पंडित पाटील आदींनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येनं कुपवाडचे नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.