प्रतिष्ठा न्यूज

भव्य महानिबंध महास्पर्धेचा निकाल जाहीर ; प्राचार्य डॉ. सतिश देसाई प्रथम तर प्रा. दादासाहेब ढेरे द्वितीय

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर (प्रतिनिधी) : आपल्या सर्वांचे आदर्श, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समतावादी आणि मानवतावादी विचारांचा जागर करण्यासाठी मराठी भाषेतील सर्वात मोठ्या भव्य महानिबंध महास्पर्धेचा भव्य महा निकाल अनिल म्हमाने, प्रा. शहाजी कांबळे, रुपाताई वायदंडे, विश्वासराव तरटे, हंबीरराव तरटे यांनी आज जाहीर केला.
निर्मिती फिल्म क्लब आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्यावतीने सर्वव्यापी छत्रपती शिवाजी महाराज : जीवन, कार्य आणि विचार या विषयावरील आयोजित निबंध स्पर्धेमध्ये पाचगणी येथील प्राचार्य डॉ. सतिश देसाई यांचा निबंध प्रथम आला असून प्रथम क्रमांकाचे भव्य महाबक्षीस 5,00,000/- ज्यामध्ये एक लाख रुपये रोख आणि चार लाखांची पुस्तके त्यांना मिळणार आहेत. तर कवठे महंकाळ जि. सांगली येथील प्रा. दादासाहेब ढेरे यांचा निबंध द्वितीय आला असून द्वितीय क्रमांकाचे भव्य महाबक्षीस
3,00,000/- ज्यामध्ये पन्नास हजार रुपये रोख आणि अडीच लाखांची पुस्तके त्यांना मिळणार आहेत.
भव्य महानिबंध महास्पर्धेत 20 स्पर्धकांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली आहे. ते स्पर्धक पुढीलप्रमाणे डॉ. सोमनाथ माने, तुकाराम कोले, नामदेव कोकाटे, सत्यजित पाटील, आरती साठे, समीर मुल्ला, सचिन पोकळे, गोपाळ शेळके, स्वप्निल जाधव, उमेश कल्याणी, पांडुरंग कदम, माणिकराव माळी, सूर्यकांत डोंगरे, राजेश पाटील, श्वेता कांबळे, मृण्मयी गायकवाड, डॉ. स्वप्नाली जोग, अशोक पाटील, सारिका देशमुख, मनिष कुलकर्णी या स्पर्धकांना प्रत्येकी 10,000/- ज्यामध्ये एक हजार रुपये रोख आणि नऊ हजारांची पुस्तके मिळणार आहेत.
बक्षीस वितरण समारंभ रविवार दि. 9 जून, 2024 रोजी दुपारी 1:00 वा., राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर या ठिकाणी होणार असून छत्रपती शिवाजी महाराज प्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ. नामदेवराव मोरे, अरहंत मिणचेकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.