प्रतिष्ठा न्यूज

तासगावातील आमरण उपोषणास युनायटेड बी.ए.एम.एस.डॉक्टर्स असोसिएशनचा पाठिंबा… दोन उपोषणकर्त्यांची तब्बेत खालवली..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:दिवसें दिवस राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापू लागला आहे.तासगावसह तालुक्यातही आरक्षणाच्या मागणीचा रेटा वाढत आहे.मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज पाटील जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.त्याला तासगाव शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी उत्स्फूर्तपने पाठींबा दिला आहे.अनेक गावात नेत्यांना येण्यास बंदी घातली आहे.शहरात सुरु असलेल्या आमरण आणि साखळी उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलक विविध मार्गाचा अवलंब करत आहेत. आमरण उपोषणास बसलेल्या आंदोलकांना पाठिंबा म्हणून हजारो मराठा बांधवानी मशाल मोर्चा काढला, तसेच काल 35 जणांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला.उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यांनी कोणताही सरकारी उपचार घेण्यास नकार दिला होता,परंतु काल रात्री अचानक चिंचणीचें अक्षय पाटील आणि मनोज पाटील या दोघांची तब्बेत बिघडली त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु केले आहेत.आमरण उपोषण करणाऱ्यांना तातडीने उपचार व्हावेत,तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज युनायटेड बी.ए.एम.एस डॉक्टर्स संघटनेच्या सर्व डॉक्टरांनी येऊन पाठिंबा दिला.यावेळी तासगाव सह तालुक्यातील सर्व डॉक्टर हें मराठा समाज आरक्षनासाठी  उपोषण करणाऱ्या आंदोलकांसाठी चोवीस तास मोफत सेवा देण्यासाठी उपलब्ध असतील अशी ग्वाही सर्वांच्या वतीने देण्यात आली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.