प्रतिष्ठा न्यूज

तासगाव कवठेमहंकाळचें प्रभाकरच आमदार..पालकमंत्री सुरेश खाडे. तासगाव कवठेमहंकाळ मधील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगांव : सांगली लोकसभा मतदार संघातून खासदार संजय काका पाटील हे हॅट्रिक करणार हे निश्चित आहेच पण त्याचबरोबर तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातही कमळ फुलणार आहे. तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाचे प्रभाकर पाटील हेच आमदार असतील असे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.तासगाव कवठेमहंकाळ मतदार संघातील नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा त्याचबरोबर नूतन ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचा  तसेच संजय गांधी योजनेच्या अध्यक्ष व सदस्यांचा सत्काराचा कार्यक्रम तासगाव येथे आयोजित करण्यात आला होता,यावेळी खाडे बोलत होते.यावेळी व्यासपीठावर सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील,भारतीय जनता पार्टीचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष निशिकांत पाटील, सांगली लोकसभा मतदार संघाचे प्रभारी दिपक शिंदे (बाबा),तासगांव कवठेमंहकाळ विधानसभेचे निवडणूक प्रमुख प्रभाकर संजय पाटील (बाबा) यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल शेठ पाटील  उपस्थित होते.यावेळी बोलताना पालकमंत्री सुरेश खाडे म्हणाले,भाजपा पक्षाचे व्हिजन व विचार घेऊन काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला देशाचे भविष्य घडवायचे आहे.आपल्या राष्ट्राची विकसीत राष्ट्र म्हणुन ओळख निर्माण करण्याचे काम २०१४ ला सुरु झाले.आज संपुर्ण जगाचे लक्ष आपल्या देशातील विकसीत होणार्‍या शहराकडे व योजनांकडे आहे.यावेळी बोलताना संजय काका पाटील यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.त्याचबरोबर या पुढील काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केल्या, तसेच सांगली जिल्ह्यातील प्रत्येक बुथवर कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी पार पाडायची आहे या कामात त्यांना पदाधिकारी मदत करतील असे ते म्हणाले भाजपा पक्षाच्या माध्यमातुन देशातील प्रत्येक घटकाचे चांगले भविष्य घडले यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत.२०२९ पर्यत आपल्या भारत देशाला विकसित देश म्हणुन संपुर्ण जग निश्चित स्विकारेल.येणार्‍या निवडणुकीत कोणाचा पराभव करायचा म्हणून भाजपाचे काम करु नका तर देशहितासाठी व आपला देश सर्व क्षेत्रात अव्वल ठरावा यासाठी करावे आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत.यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले
२०२४ ची निवडणुक हि ऐतिहासीक निवडुणक होऊन भाजपा पक्षाचा महाविजय होईल,याचे साक्षीदार होण्याचे भाग्य तुम्हाला,आम्हाला मिळणार आहे.२०२९ ला भारत देश संपुर्ण जगाचे नेतृत्व निश्चित करेल असा विश्वास भाजपाचे सांगली जिल्हा अध्यक्ष निशिकांत पाटील  यांनी व्यक्त केला.यावेळी बोलताना सांगली जिल्हा भाजपाचे सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी दीपक शिंदे म्हणाले भाजपा पक्षाचे व्हिजन हे देशाची अर्थव्यवस्था बदलणारी,देशात उद्योग निर्मिती करणारे,नवनविन टेक्नाॅलाॅजी निर्माण करणारे,देशातील प्रत्येक घटकापर्यत विकास योजना पोहचविणारी आहे,देशाची सुरक्षा मजबुत करणारे आहे.यावेळी बोलताना तासगांव कवठेमहंकाळ विधानसभा निवडणुक प्रमुख प्रभाकर पाटील (बाबा) म्हणाले आपल्या सारखे जिवाभावाचे मावळे भाजपा पक्षाला मिळाले आहेत,भाजपा पक्षाचा विचार घेऊन आपण काम करत आहात याचा आम्हाला अभिमान आहे,आपल्या मतदार संघातील सर्वगिण विकासाबरोबर उद्योग व्यवसाय,दळण वळण व्यवस्था,पाण्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे.येणार्‍या निवडणुकीत आपण रात्रीचा दिवस करुन काम करा पुन्हां आपण लोकसभेत या मतदार संघातुन भाजपा पक्षाचा खासदार पाठवु.यापूर्वी आपण खासदार संजय काका पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ज्याप्रमाणे साथ दिली त्याप्रमाणे यापुढील काळात ही भारतीय जनता पार्टी सोबत राहावे असे आवाहन ही त्यांनी शेवटी केले. स्वागत व प्रास्थाविक करताना सुनील पाटील यांनी तासगाव कवठेमंकाळ  मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला त्याचबरोबर केवळ ज्यांना पदाधिकारी केले त्यांच्यापेक्षा सर्वसामान्य कार्यकर्त्यांची जबाबदारी जास्त असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. जिल्हा परिषदेचे सभापती  प्रमोद शेंडगे यांनी सांगली जिल्ह्यात पाणी योजनाचे झालेले काम हे फक्त खासदार संजय काका पाटील यांच्यामुळेच झाले आहे बाकी कोणीही आम्ही पाणी आणल्याच्या वल्गना करू नयेत.जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे या पुढील काळात खासदार संजय काका पाटील  व भारतीय जनता पार्टी साठी सर्व पदाधिकारी जीवाचे रान करतील याची ग्वाही दिली.यावेळी विसापूर सर्कल भाजपचे नवनाथ पाटील यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला तासगाव तालुका भाजपचे अध्यक्ष सुनील जाधव,शहराध्यक्ष हनमंत पाटील,संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष सुखदेव पाटील,माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर,अविनाश पाटील,बाबासाहेब पाटील,  चिखलगोठण चे युवा नेते अमित पवार व त्यांचे सहकारी ग्रामपंचायत पदाधिकारी शिवसेनेचे संजय चव्हाण, अनिल कुत्ते,दिग्विजय पाटील,संदीप सावंत,अरुण साळुंखे,वसंत चव्हाण , अनिल पवार, संतोष नलवडे,संतोष चव्हाण उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.