प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 26 फेब्रुवारीला सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन : युवराज शिंदे

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेच्या वतीने रविवार दिनांक 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हिरकणी कट्टा या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण पंधरा हजार रुपये रोख रकमेची नऊ बक्षीस वितरण करण्यात येणार आहेत. यानंतर मा महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी आमदार शरद पाटील सर यांच्या उपस्थितीत सांगलीच्या विकासाचे शिल्पकार या विशेष अंकाचे प्रकाशन होणार आहे. रक्तदान शिबिर, सांगलीचे नाव ज्यांनी ज्यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले अशा मान्यवरांना सांगली जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रसिद्ध विचारवंत व्याख्याते गंगाधर बनबरे यांच्या यांचे व्याख्यान व स्नेहभोजन इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा सर्व सांगलीकरांनी लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी बोलताना दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.