प्रतिष्ठा न्यूज

शासनाची “पाणी आडवा-पाणी जिरवा” योजना कागदावरच दार बसविले नसल्यामुळे हिंदोळा येथील बंधारा कोरडाठाक

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा प्रतिनिधी : लोहा तालुक्यातील हिंदोळा येथील नदीवर शासनाने लाखो रुपये खर्च करून कोल्हापुरी बंधारा बांधला, मात्र जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे या परिसरात अनेकदा अतिवृष्टी होऊन सुद्धा बंधाऱ्याला दार बसवले नसल्यामुळे रब्बी हंगामातच पावसाळ्याचे पाणी वाहून गेल्यामुळे बंधारा कोरडाठोक पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

उमरा परिसरातील हिंदोळा-कापसी बु.येथील नदीवर शासनाकडून उन्हाळ्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी “पाणी आडवा-पाणी जिरवा” या धोरणात्मक योजने नुसार पावसाचे पडलेले पाणी वाहून न जाता अडविल्यास पाणी टंचाई दूर होईल व जमीनीतील पाणीपातळीत वाढ होईल या हेतूने लाखो रुपये खर्चून कोल्हापुरी बंधान्याची उभारणी केली. मात्र जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे सदर बंधाऱ्यावर दार बसविले नसल्यामुळे यंदा या परिसरात अनेकदा मोठमोठे पुर येऊन अतिवृष्टी झाली.
मात्र या बंधाऱ्यावर दार बसविण्यासाठी ना प्रशासनाने पाहीले ना लोकप्रतिनिधी लक्ष दिले, या मुळे हा बंधारा ऐन रब्बी हंगामात कोरडा पडला आहे. या बाबत शेतकन्यांशी प्रतिक्रिया विचारली असता लघुपाटबंधारे विभागाच्या उदासीन धोरणामुळे या बंधाऱ्यावर दार टाकले नाहीत, मात्र ते चोरीस गेले समजुन त्याची तक्रार पोलिसात दिली मात्र पुढे कुठलीच कारवाई झाली नाही.अशी प्रतिक्रिया हिंदोळा येथील सोपान जाधव यांनी दिली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.