प्रतिष्ठा न्यूज

मिलींद कुलकर्णी यांना गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाची भावपुर्ण श्रध्दांजली

प्रतिष्ठा न्यूज
मिरज दि. 03 : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्स्टचे कार्यालयीन अधिक्षक, मिलींद हणमंत कुलकणी (51) यांचे नुकतेच अकाली निधन झाले. आज संस्थेच्या वतीने शोकसभेचे आयोजन स्व. पतंगराव कदम खुले सभागृह येथे करण्यात आले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्र पाटील यांनी मिलींद कुलकर्णी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपुर्ण अभिवादन केले.
या शोकसभेमध्ये उपस्थित संस्थेच्या सर्व शाखांचे प्राचार्य, प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी दोन मिनीटे स्तब्ध्दता पाळून त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सदगती लाभो अशी प्रार्थना केली. यावेळी गुलाबरव पाटील होमिओपॅथिक मेडीकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मेथे यांनी मिलींद कुलकर्णी यांच्या प्रशासकीय कामाबद्दल बोलताना त्यांची कर्तव्यदक्षता, काटकसर, वक्तशिरपणा यांचा उल्लेख केला. संस्थेचे प्रशासकिय अधिकारी विलास शेवाळे यांनी त्यांना त्यांच्यासोबत काम करीत असताना आलेले अनुभव सांगुन श्रध्दांजली वाहीली. विश्वस्त विरेंद्र पाटील म्हणाले, त्यांनी अत्यंत विश्वासू व स्वच्छ व पारदर्शक कामकाज करून संस्थेचा विश्वास संपादन केला होता. कागदोपत्री इतका अचुकपना असायचा की, फारस खोलात जावुन तपासणी करावयाची आवश्यकता नव्हती.
यावेळी संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील म्हणाले, कुलकर्णी यांचे आकस्मित निधन हा संस्थेच्या दृष्टीने मोठा धक्का आहे. ते गेली 30 वर्षे संस्थेत कार्यरत होते, अत्यंत प्रामाणिक व विश्वासू काम केले, त्यांची आठवण कायम येत राहील, संस्था केवळ संस्थाचालकांवर चालत नाही, तर प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सेवकांमुळे मोठी होते. संघ वृत्ती आणि सेवाभाव यामुळे टिमवर्क मजबुत होते. या दृष्टीने कुलकर्णी यांचे योगदान मोठे आहे. प्रशासकीय सेवक हा संस्थेचा कणा असतो. हे कुलकर्णी यांनी कामातुन सिध्द केले. ते अत्यंत विनयशिल व कामसु होते. त्यांच्या निधनामुळे संस्थेचे नुकसान व त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांबर मोठा आघात झालेला आहे. संस्था त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांच्या मुलीच्या शिक्षणाची संस्था जबाबदारी घेईल आणि संस्थेच्या कार्यालयात कृतज्ञता म्हणुन त्यांचा फोटोही लावण्यात येईल.
या शोकसभेमध्ये संस्थेचे समन्वयक डॉ. सतिश पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, प्राचार्य डॉ. बिभिषन कराळे, शाळा अधिक्षिका ख्रिस्टीना मार्टीन, प्राचार्य साहेबलाल शरीकमसलत, प्राचार्या श्रीदेवी कुल्लोळी, प्राचार्या डॉ. आकांक्षा जोशी, प्राचार्य विनय डोंगरे, प्राचार्य अभयकुमार गायकवाड सर्व शाखांचे प्रमुख, समन्वयक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.