प्रतिष्ठा न्यूज

वंजारवाडीत डॉल्बी मुक्ती : ग्रामपंचायतीच्या अंमलबजावणीचे तालुक्यातून कौतुक

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तालुक्यातील काही ग्रामपंचायतीनी डॉल्बी मुक्तीचा ठराव करून माध्यमातून चमकण्याचा प्रयत्न केला,मात्र नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात या ठरावांना कवडीचीं किंमत नाही,याचा प्रत्यय तालुक्यातील जनतेला आला.डॉल्बी वाल्यांनी या ठरावांना फाट्यावर मारत दणकून डॉल्बी वाजवला.मात्र तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायतीने १५ ऑगस्टला डॉल्बीबंदीचा नुसता ठरावच न घेता त्याची अंमलबजावणी सुद्धा केली. गावात श्री गणेश विसर्जना दिवशी विसर्जन मिरवणुकीसाठी ऐनवेळी डॉल्बी घेऊन आलेल्या गणेश मंडळाला डॉल्बी वाजवण्यास सरपंच अरुण खरमाटे,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांनी विरोध केला.व तात्काळ याची तासगाव पोलिसात तक्रार करून ग्रामपंचायतीने डॉल्बीचा आवाज बंद केला.त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.नुसते ठराव करून त्याची अंमलबजावणी न करणाऱ्या गावांनी वंजारवाडीचा आदर्श घेण्याची गरज आहे.
चौकट:डॉल्बी वाजू देणार नाही: अरुण खरमाटे
डॉल्बीच्या आवाजाने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला माझ्या गावात लहान मुले,अभ्यास करणारे विद्यार्थी, गर्भवती स्त्रिया,वृध्द यांसह निसर्गातील मुके जीव यांच्यासाठी डॉल्बीचा आवाज घातक आहे.यामुळे यापुढे वंजारवाडीत डॉल्बी वाजू दिला जाणार नाही असा निर्णय गावाने घेतला आहे.अशी माहिती सरपंच अरुण खरमाटे यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.