प्रतिष्ठा न्यूज

एन.एस. सोटी लॉ कॉलेजमध्ये राज्यस्तरीय मुट कोर्ट स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे
सांगली : येथील लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या एन.एस. सोटी लॉ कॉलेजमध्ये सांगलीतील प्रसिध्द आयकर सल्लागार स्व.ॲड. के.बी.कायस्थ यांचे नावे दरवर्षी राज्यस्तरीय मुटकोर्ट स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेचे हे एकविसावे वर्ष आहे. या स्पर्धेचे उद्धाटन लठ्ठे शिक्षण संस्थेचे चेअरमन शांतिनाथ कांते यांचे हस्ते संपन्न झाले. स्पर्धेमध्ये काही विद्यार्थीच विजयी होतात परंतू इतर स्पर्धकांनी नाराज न होता स्पर्धेतील सहभाग ही एक सुवर्णसंधी मानावी असे प्रतिपादन दिवानी न्यायाधीश ए.बी.जावळे यांनी केले. सुरवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.डॉ.अमित सवदी यांनी प्रास्ताविक करून सर्वाचे स्वागत केले. या वेळी संस्थेचे मॅनेजिंग व गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत नवले यांचे सह महाविद्यालयाचे प्राध्यापक यांचे सह विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र व गोवा राज्यातुन एकुण चौदा विविध विधी महाविद्यालयानी भाग घेतला होता. या मध्ये अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, फलटन, गोवा, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, कराड, बारामती, कुडाळ येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परीक्षक न्यायाधीश म्हणून सांगलीचे ॲड.प्रमोद सुतार, ॲड. अभिनंदन शेटे, ॲड.फारुख कोतवाल, ॲड.चिराग सोनेचा व माजी जिल्हा न्यायाधिश मा. मुकुंद दोते यांनी काम पाहिले.
या स्पर्धेमध्ये जी.आर.करे विधी महाविद्यालय गोवाचे रोहन नाईक, सिद्धार्थ शिरोडकर, वान्या दा कोस्टा या विद्यार्थ्यांच्या संघाने प्रथम क्रमांक व एन.एस.सोटी विधी महाविद्यालय सांगली चे अमोल वेटम, सना मुजावर, अजिंक्य पाटील या विद्यार्थ्यांच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. कुडाळ विधी महाविद्यालयाची विद्यार्थीनी दिपीका राठोड हिने उत्कृष्ट महिला वकिल तर जी.आर.करे विधी महाविद्यालय गोवा चा विद्यार्थी रोहन नाईक याने उत्कृष्ट पुरुष वकिल म्हणून पारितोषिक संपादन केले, मुट कोर्ट स्पर्धेसाठी दिलेल्या केसच्या उत्कृष्ट लेखी सादरीकरणाचे बक्षिस कुडाळ महाविद्यालयाला मिळाले तर उत्कृष्ट संशोधना साठी अजिंक्य पाटील सांगली व आसावरी गोगाटे यांना विभागुन देण्यात आले.  सर्व यशस्वी स्पर्धकानां दिवानी न्यायाधीश ए.बी.जावळे यांच्या हस्ते  पारितोषिक व बक्षिसे वितरीत करण्यात आली. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अमित सवदी यांनी अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सलोनी कुलकर्णी, मानसी जोशी, गुरुप्रसाद तेरवाडकर यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ.अतुल कुरणे, यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. प्राध्यापक डॉ. ए.व्ही.कुलकर्णी, प्राध्यापक एम.एम.देशपांडे, प्राध्यापक बी.के.जाधव, ए.बी.साळुंखे व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे बरोबर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.