प्रतिष्ठा न्यूज

तासगाव आर आर आबा पाटील ग्रंथालयात लहान मुलांसाठी बालकुमार ज्ञान कोपरा उपक्रम

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव येथील आर आर आबा पाटील ग्रंथालयात लहान मुलांसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे.लहान मुलांमध्ये लहानपणापासूनच वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ग्रंथालयात वेगळा भाग निर्माण करून बाल कुमार ज्ञान कोपरा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी लहान मुलांना त्यांच्या आवडीची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत.सद्य परिस्थितीला लहान मुलांचा कल मोबाईल बघण्याकडेच जास्त आहे, त्यांची पुस्तकं वाचनाची आवड कमी होताना दिसत आहे.त्या अनुषंगाने लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे बौद्धिक ज्ञान वाढावे, मुले ग्रंथालयाकडे आकर्षित व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याचे ग्रंथालयाचे अध्यक्ष एडवोकेट तुकाराम कुंभार यांनी सांगितले.ग्रंथालयाने सुरू केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.संपूर्ण उन्हाळी सुट्टीत हा उपक्रम सुरू राहणार आहे.या उपक्रमाचे उद्घाटन ग्रंथालयाचे अध्यक्ष एडवोकेट तुकाराम कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी एडवोकेट गजानन खुजट,एडवोकेट निलेश कुंभार, ग्रंथपाल माया मोरे, दीपक मोरे,संतोष कुंभार उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.