प्रतिष्ठा न्यूज

संकेतला महापालिका देणार 5 लाखांचे बक्षीस : आयुक्त नितीन कापडणीस यांची घोषणा

संकेतची बहीण काजोलला 1 लक्ष तर दोघांनाही महापालिका दत्तक घेऊन दरमहा 10 हजाराची स्कॉलरशिप देणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणारा सांगलीचा सुपुत्र संकेत सरगर याला महापालिकेकड़ून 5 लक्ष तर बहिन काजोलला 1 लक्षचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी आज संकेतच्या आईवडिलांची भेट घेऊन संकेतच्या यशाबद्दल अभिनंदन केले. यावेळी आयुक्त कापडणीस यांनी संकेतही व्हिडिओ कॉल द्वारे संवाद साधत त्याच्या तब्येतीची विचारपूस केली.. यावेळी बोलताना आयुक्त कापडणीस यांनी संकेत सरगर याला 5 लक्ष तर तिची बहिन खेलो इंडिया मध्ये सुवर्णपदक विजेत्या काजोलला 1 लाखाचे प्रोत्साहन बक्षीस जाहीर केले. याचबरोबर संकेत आणि काजोलला महापालिका दत्तक घेणार असल्याचं सांगत दोघांनाही प्रोत्साहन म्हणून महापालिकेकडून प्रतिमहा 10 हजाराची स्कॉलरशिप देण्याचे जाहीर केले. तर संजय नगर भागात संकेत आणि काजोल तसेच अन्य खेळाडूसाठी अध्यावत जिम आणि प्रशिक्षक महापालिका उपलब्ध करुन देणार असल्याचेही मनपा आयुक्त नितिन कापडणीस यांनी यावेळी सांगितले. यावेळी नगरसेवक मनगु सरंगर, संतोष पाटील, मनोज सरगर, संजय कांबळे,मनपाचे सहायक आयुक्त नितीन शिंदे, वैभव वाघमारे, नकुल जकाते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.