प्रतिष्ठा न्यूज

दुष्काळी भागाचा कायापालट करण्यावर नद्याजोड प्रकल्प हाच एकमेव मार्ग : राज्य प्रवक्ते संतोष पाटील

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जत तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष माननीय सुनील पोतदार यांच्या नेतृत्वाखाली जत तालुका कायम स्वरूपी दुष्काळमुक्त करावा या मागणीसाठी सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर एक दिवसीय ठियया आंदोलन केले.या ठिय्या आंदोलनाला मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी पाठिंबा देऊन मार्गदर्शन केले यावेळेला राज्य प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले एकीकडे कोल्हापूर आणि सांगली शहराच्या बाजूनेच पंचगंगा वारणा व कृष्णा नद्या पावसाळ्यात दुथडी भरून वाहत असता.प्रचंड झालेल्या पावसामुळे सांगली व कोल्हापूर शहरे निम्म्याहून अधिक पाण्याखाली जातात तर दुसरीकडे सांगली जिल्ह्यातीलच जत,कवठेमंकाळ,आटपाडी कायमस्वरूपी असणारे दुष्काळ भाग व महाराष्ट्राच्या बॉर्डर व कर्नाटकच्या बॉर्डरवर कायमस्वरूपी ज्या तालुक्याची गणना केली जाते तो जत तालुका. या जत तालुक्याची भौगोलिक परिस्थिती जिल्ह्यात सगळ्यात मोठा तालुका म्हणून ओळखला जातो तांत्रिक दृष्ट्या पर्जन्यमान कमी असल्यामुळे सर्व जिल्ह्यातून कायम तापमान कक्षाच्या बाहेर असणारा या तालुक्यात आणि पावसाळ्यात सुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करावी लागते, तर शेतीला पाणी हे दूरच. या उलट सांगली शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात महापुराचे घुसून दैनंदिन अवस्था खूप हलकीची व बिकट होते.सांगली जिल्ह्याला वारणा व कृष्णानदी असल्यामुळे प्रचंड महापुराच्या पाण्याचा दबाव शहरावर येतो ही परिस्थिती सर्व महाराष्ट्राने बघितले आहे हेच पाणी का जर नद्याजोड प्रकल्पामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मदतीमुळे जर नद्या _जोडच्या प्रकल्प करून जत,कवठेमंकाळ, किंवा आटपाडी ह्या भागात पुराचे येणारे पाणी जर पावसाळ्यात फिरवले तर त्या भागचा कायमस्वरूपी असणाऱ्या दुष्काळाचा कलंक पुसून जाईल व हे राज्य सरकार व केंद्र सरकारने करावे अशी मागणी या वेळेला ठिय्या आंदोलनाच्या वेळेला राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी केली. या वेळेला समितीचे अध्यक्ष माननीय सुनील पोतदार म्हणाले की राज्य सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केले तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना बोलवून प्रत्येक गावात जाऊन ग्रामसभा घेऊन आम्हाला कर्नाटकामध्ये घ्यावे अशी मागणी करण्यात येणार आहे यावर केंद्र व राज्य सरकारने तोडगा काढून जत तालुक्याचा कायमस्वरूपी असणारा दुष्काळ हटवावा अशी मागणी माननीय सुनील पददार यांनी या आंदोलनाच्या वेळेला केली या वेळेला शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश राज्यप्रवक्ते माननीय महेश खराडे म्हणाले की आमची स्वाभिमानी शेतकरी संघटना कायम शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर येऊन आंदोलन चळवळी त रस्ता रोको व मंत्र्यांनाही आडवण्यास आम्ही मागे पुढे बघत नाही आमच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारला शालेय पोषण आहारामध्ये बेदाणा घेण्यास भाग पडले याच पद्धतीने जत तालुक्याला पाणी देण्यास ही भाग पाडू असे वक्तव्य केले. या वेळेला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य चन्नाप्पा होरतीकर, पाणी संघर्ष समितीचे सदस्य श्रीशैल्य उमराणी, विक्रम ढोणे, रोहित सुळे अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.