प्रतिष्ठा न्यूज

डेरला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत “गणवेश व शैक्षणिक साहित्याचे” वाटप

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा : लोहा-ताल्युक्यातील डेरला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शासनाच्या समग्र शिक्षा अभियानातंर्गत मोफत गणवेश व खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भा.ज.पा.युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय घोगरे यांच्या  अध्यक्षतेखाली सर्व विद्यार्थ्यांना पँड या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी मा.राष्ट्रपती- डाँ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक राज्य पुरस्कार प्राप्त या शाळेचे मुख्याध्यापक- पंडितराव पवळे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन मा.सरपंच- कामाजी पाटील कदम यांनी केले. यावेळी शाळेतील 104 विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष- गुलाबराव शिंदे, उपाध्यक्ष- सुशिलकुमार शिंदे ,उपसरपंच- उमाकांत  शिंदे, सरपंच- बालाजी शिंदे, सामाजिक कार्यकर्ते- कैलास हंबर्डे, चेअरमन- बालाजी शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष- उत्तमराव शिंदे, ग्रा.प.सदस्य- देवराव कदम, नारायण धुमाळे, नंदकिशोर शिंदे, तंटामुक्तीचे उपाध्यक्ष- चंद्रकांत कदम, मराठा समन्वय समितीचे- सुभाष शिंदे, बळीराम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षिका- मनिषा पवार, अंजली भंडे, दिपाली सनपूरकर, सारीका बोधनकर, पद्मीनबाई धुमाळे यांनी परिश्रम घेतले .यावेळी विद्यार्थी, पालक, व गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार- उत्तम क्षीरसागर यांनी केले .
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.