प्रतिष्ठा न्यूज

सिकई मार्शल आर्ट राज्य स्तरीय स्पर्धेत गगनबावड्यातील ‘परशुराम’ ची अस्मिता संकपाळ व्दितीय

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२९ :  सिकई मार्शल आर्ट ही राज्यस्तरीय स्पर्धा ठाणे या ठिकाणी पार पडली. या स्पर्धेत  गगनबावडा येथील परशुराम विद्यालय,  ची विद्यार्थिनी कु. अस्मिता रामचंद्र संकपाळ हिने राज्यस्तरीय शालेय सिकई मार्शल आर्ट क्रीडा स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळविला. प्रशिक्षक महेश राठोड, वडील रामचंद्र संकपाळ,   मुख्याध्यापक गोसावी ,क्रिडा शिक्षक थोरात  यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या यशाबद्दल सर्वत्र  कौतुक होत आहे.
अस्मिता हिने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.