प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांचा 10 व्या वर्षी शुक्रवारी दारू नको दूध प्या उपक्रम : मराठी हिंदी गाण्यांचाही भरगच्च कार्यक्रम

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 31 डिसेंबरला नववर्षाचे स्वागत करताना दारू सारख्या व्यसनाला आहारी जाऊ नका आणि दारू ऐवजी दूध प्या आणि व्यसनमुक्त रहा असा संदेश देत सांगलीत शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता दारू नको दूध प्या उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापालिकेच्या माझी वसुंधरा 3.0 आणि स्वच्छ सर्व्हेक्षण 2023 अंतर्गत महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी सलग 10 व्या वर्षीही आपला सेवाभावी आणि प्रबोधनात्मक उपक्रम सुरू ठेवला आहे. यानिमित्त ए शाम मस्तानी सिंगींग ग्रुपच्या मराठी हिंदी गाण्यांचा भरगच्च कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त सुनील पवार, पद्मश्री डॉ. विजयकुमार शाह, उपायुक्त राहुल रोकडे, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौ. अंचाल दलाल, स्थायी सभापती धीरज सुर्यवंशी, गटनेत्या भारती दिगडे, पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, वाहतूक पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, विश्रामबाग पोलीस निरीक्षक कलाप्पा पुजारी , मालती फाऊंडेशनचे रमाकांत घोडके यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या कार्यक्रमाची सुरवात दीपक चव्हाण आणि सोनाली केकडे प्रस्तुत आणि सुहास फडतरे, कुणाल शर्मा, रफिक भालदार यांच्यासह ए शाम मस्तानी ग्रुपकडून गाण्यांच्या भरगच्च कार्यक्रमाने होणार असून त्यानंतर ए वन चावी आणि कुकडे बंधू यांच्याकडून दूध वाटप करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन
अहमद शेख, राजू पळसे, सचिन साठे, सुजित काटे, सोमनाथ सुर्यवंशी, इमरान पटवेगार, आदिल कच्छी, अभी कुकडे, वैभव चौगुले, योगेश माने, जय कुकडे आणि मित्रमंडळ चौकातील नागरिकांनी केले आहे. या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थित राहून गाण्यांच्या अस्वादा बरोबर मसाले दुधाचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे ब्रँड ॲम्बेसेडर दीपक चव्हाण यानी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.