प्रतिष्ठा न्यूज

एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये, अभियांत्रिकी व विश्वकर्मा दिन उत्साहात साजरा

 प्रतिष्ठा न्यूज/योगेश रोकडे
 सांगली : महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी संचलित एम.टी.ई.एस. इंग्लिश स्कुलमध्ये अभियांत्रिकी व विश्वकर्मा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी भारताच्या संरक्षण क्षेत्रातील विविध क्षेपणास्त्रे ( पृथ्वी, नाग, आकाश, पिनाका, अग्नी, अस्त्र आणि ब्रम्हाज ) चंद्रयान-३ चे पार्टस बनवण्यासाठी ज्यांची मोलाची मदत झाली, असे बहुआयामी व्यक्तीमत्व, डँझेल डायना कोट्सचे मॅनेजिंग डायरेक्टर संदीप दिनकर सोले  उपस्थित होते.  तसेच कॉज टू कनेक्ट संस्थेच्या प्रोग्रॅम ऑफिसर दिपाली खैरमोडे  ही उपस्थित होत्या. प्रमुख पाहुण्यांची ओळख व सत्कार प्रशालेच्या प्राचार्या  इंदिरा पाटील यांनी पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन केले.
     या कार्यक्रमांतर्गत प्रमुख पाहुणे श्री संदीप सोले यांच्या शुभहस्ते बहुविध कौशल्य अभ्यासक्रम कार्यशाळेतील साधनांचे पूजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, प्रत्येक मुल हे जन्मत:च एक अभियंता असते. प्रत्येकाने आपल्यातील संशोधक वृत्तीचा दैनंदिन जीवनात चांगला उपयोग करावा असे त्यांनी सांगितले. जीवनात आलेली संधी न दवडता त्या संधीचे सोने करावे असा बहुमोल सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. भारतातील शास्त्रज्ञांची, त्यांनी केलेल्या संशोधनाची तसेच विविध क्षेपणास्त्रांची नावे सांगून, भारत देश किती बलाढ्य आहे हे सुद्धा त्यांनी विविध उदाहरणातून पटवून दिले.
         या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज (बाबा) देशमुख, उपाध्यक्ष डॉ.प्रसाद केळकर व सचिव सुरेंद्र चौगुले यांचेही मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास प्रशालेच्या प्राचार्या इंदिरा पाटील व उपप्राचार्या अंजना कोळी, तसेच एमटीईएस मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका  स्वाती कुलकर्णी, मल्टी स्किल फाउंडेशन चे सर्व शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेच्या सहशिक्षिका वैशाली पाच्छापुरे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.