प्रतिष्ठा न्यूज

तासगावात गुरुवार पासून रोटरी महोत्सव.. भव्य ग्रहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : रोटरी क्लब ऑफ तासगाव यांचेकडून रोटरी महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.गुरुवारी 8 फेब्रुवारी रोजी गृहपयोगी वस्तूंच्या प्रदर्शनाचा भव्य शुभारंभ सायंकाळी 5 वा रोटरी क्लब ऑफ सांगलीचे डि.जी.रो.नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते तसेच तासगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले व तासगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.शुक्रवार दि 9 रोजी सायंकाळी 6 ते 9 या वेळेत सप्तसुरांच्या पलीकडे या हिंदी मराठी सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम असून शनिवार दि.10 रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत महिलांसाठी स्मार्ट सुनबाई स्पर्धेचे आयोजन केले आहे.रविवार दि.11 रोजी दु. 4 ते 6 यावेळी होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) तसेच एक हसीन सफर या हिंदी मराठी गाण्यांची रंगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.सांगली नाका तासगाव येथील मोठ्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ तासगावचे प्रेसिडेंट रो.राहुल तेली यांनी दिली आहे.रोटरी क्लब ऑफ तासगाव,इनर व्हील क्लब ऑफ तासगाव, रोट्रॅक्ट क्लब ऑफ तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बी.आर.साडी डेपो व नोबल ज्वेलर्स यांच्या प्रायोजक सहकार्याने रोटरी महोत्सव 2024 साकारले जात असून 5 दिवस चालणाऱ्या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.