प्रतिष्ठा न्यूज

श्री सावळसिद्ध विकास सोसायटीचे काम तालुक्यात आदर्शवत – सांगली जिल्हा बँकेचे विशेष वसुली अधिकारी श्री गजानन पाटील यांचे प्रतिपादन

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
सावळज प्रतिनिधी दि.6 : सावळज ता.तासगाव येथील श्री सावळसिद्ध विकास सोसायटी,सावळज या संस्थेचे कामकाज तासगाव तालुक्यात आदर्शवत असून संचालक मंडळाने घेतलेल्या अनेक निर्णयाने संस्थेची प्रगती होत आहे आणि त्याचा लाभ सभासदांना होत आहे, असे प्रतिपादन नियमित कर्जदार प्रोत्साहन योजनेतून वजन काटे वाटप कार्यक्रमाप्रसंगी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विशेष वसुली अधिकारी गजानन पाटील यांनी केले. यावेळी अध्यक्षस्थानी तालुका वरिष्ठ अधिकारी व्यंकट पाटील हे होते.
श्री पाटील पुढे म्हणाले की, सध्या संस्थेचा शताब्दी महोत्सव साजरा होत असून यानिमित्ताने नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि सभासदांनी आपल्या कर्जबाकीचा भरणा नियमित करावा, यासाठी संस्थेने तासगाव तालुक्यात प्रथमच अशी एक अभिनव योजना आणली आहे त्या योजनेतून या सभासदांना मोफत वजन काटे वाटप करण्यात येत आहे. या सोसायटीच्या संचालक मंडळाने एकरकमी परतफेड योजनेचा प्रस्ताव जिल्हा मध्यवर्ती बँकेला देऊन त्याची अंमलबजावणी संपूर्ण जिल्ह्यात करण्यात आली. संस्थेचे नवीन संचालक मंडळ आल्यापासून सलग दोन वर्षे शंभर टक्के वसुली झालेली आहे. संस्थेतर्फे नवनवीन योजना आणून सभासदांना त्यांचा फायदा होत आहे. शताब्दी महोत्सवानिमित्त वर्षभर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे. टंचाई परिस्थिती पाहता शेतीला पाणी सोडण्यासाठी रुपये दहा लाखाची तरतूद संस्थेतर्फे करण्यात आली आहे.संस्थेतर्फे सभासदांना नाबार्ड योजनेतून मल्टीपर्पज हॉलचे नियोजन करण्यात येत आहे. येत्या काळात सर्व सभासदांनी वसुलीस सहकार्य करून संस्थेचा नावलौकिक कायम राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी श्री सावळसिद्ध विकास सोसायटीच्या वतीने नियमित कर्जदारांना प्रोत्साहनपर भेट वस्तू म्हणून वजन काटे बँकेचे अधिकारी व्यंकट पाटील, गजानन पाटील व संस्थेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संचालक प्रशांत कुलकर्णी यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव निलेश रिसवडकर यांनी मानले. यावेळी संस्थेचे पॅनल प्रमुख ऋषिकेश बिरणे ,चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हा.चेअरमन बाळासाहेब थोरात, संचालक बंडू पाटील, शिवाजी पाटील, विनेश पोळ, राजू वांडरे, बाळासाहेब निकम, विनायक पवार,प्रदीप माळी, संदीप माळी, विलास तोडकर, विजय पाटील आणि पिंटू बुधवले तसेच सभासद श्रीकांत शिंदे, खंडू माळी, रघुनाथ शिंदे,चंद्रकांत पोळ, कल्लाप्पा थोरात, शशिकांत पाटील,तसेच स्वप्नाली इलेक्ट्रॉनिक्सचे सर्जेराव पाटील व सभासद वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.