प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे श्रीराम मंदिराचा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठा पणा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न..* खासदार आणि आमदार यांनी उपस्थित राहून घेतले दर्शन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव सोमवार पेठ (दाणे गल्ली) येथील पैलवान परिवार यांच्या मालकीच्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून आज मंदिराचा कलशारोहन आणि प्राण प्रतिष्ठापणा सोहळा भक्तीमय वातावरनातं मोठ्या उत्साहात संपन्न झाला.सोमवार पेठेतील या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असून त्यानिमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पैलवान कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले होते.काल प्रभू श्री राम मंदिर कलशाची महाराजांच्या उपस्थितीत पारंपरिक ढोल ताशा,हलगीच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिष बाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती.कार्यक्रमाच्या निमित्ताने मंदिरास फुल माळांची आरास तसेच मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.आज कलशारोहण आणि प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रम सकाळी 9 वाजून 15 मिनीटांनी श्रीमद गिरीराज सूर्यसिंहासनाधीश्वर श्री श्री श्री 1008 श्री श्रीशैल्य सद्गुरु डॉ चन्नसिद्धराम पंडिताराध्य महास्वामीजी श्रीक्षेत्र श्रीशैल महापीठ यांच्या कृपा आशीर्वादाने व प्रमुख उपस्थितीत आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरनातं आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला.त्यानंतर महास्वामीजींचें आशीर्वाचन,मंगल महाआरती झाली.यावेळी खासदार संजय काका पाटील,आमदार सुमनताई पाटील,प्रभाकर पाटील,रोहित पाटील यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून प्रभू श्री राम आणि महाराजांचे दर्शन घेतले.दुपारी 1तें 4 महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.