प्रतिष्ठा न्यूज

तासगाव अंनिस कडून पत्रकारांना डॉ.नरेंद्र दाभोळकर यांचीं पुस्तकें भेट

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : समाजातील प्रत्येक घटकाला स्थान,न्याय आणि हक्क यांची जाणीव ठेऊन अविरतपणे जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडणे असो,किंवा सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या विविध प्रकारच्या बातम्या देणारा लोकशाहीचा चौथा स्तंभ असो, जोपर्यंत सक्षमपणे हे काम होत राहील तोपर्यंत संविधानाच्या मुल्याधिष्ट समाजाचा पाया मजबूत राहील.लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारांना काल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तासगाव शाखेच्या वतीने “घरोघरी दाभोळकर”या अभियानाच्या अंतर्गत पुस्तकांची भेट देण्यात आली.यावेळी जि.प.मराठी मुलांची शाळा क्रं १चे शिक्षक विशाल खाडे यांचा आदर्श शिक्षक निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविक कार्यअध्यक्ष अमर खोत यांनी केले.शाखेच्या उप  अध्यक्षा हेमलता बागवडे यांनी स्वागत केले.अध्यक्ष छायाताई खरमाटे यांनी  तासगाव मध्ये वैचारिक व्याख्याने सुरु करण्यात पत्रकार प्रामुख्याने अग्रभागी होते त्या प्रकारच्या व्याख्यान माला आयोजीत कराव्या अश्या प्रकारचे आवाहन केले.सांगली जिल्हा अध्यक्ष बाबूराव जाधव यांनी उपस्थित पत्रकार अंनिसच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी पार पाडत असतात असे मत मांडले.राज्य कार्यकारिणी सदस्य फारुख गवंडी यांनी तासगाव मधील पत्रकार नेहमीच पुरोगामी विचार पुढे नेण्यासाठी विविध मार्गांनी समाजाची बांधिलकी जपत काम करत असताना डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला आत्ता दहा वर्षे पूर्ण झाली त्या अनुषंगाने डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या लेखणीतून साकारलेली पुस्तके पत्रकार मित्रांना देताना आनंद होत असल्याचे सांगितले.कॉम्रेड महेश जोतराव यांनी तासगाव मधील मागील दहा पंधरा वर्षे पाठीमागील पुरोगामी चळवळीचा उज्वलं इतिहास संवेदनशील पत्रकांरामुळे गाजल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख उपस्थितीत प्रा डॉ बाबूराव गुरव यांनी आजच्या काळात पत्रकारांची भुमिका समाजाला दिशा देण्यासाठी खुपचं महत्वाची आहे त्यांनी घेतलेल्या भुमिका समाजाला मार्ग दाखवतात, सध्याच्या परिस्थितीत कठीण प्रसंगात आपले बातमी मूल्यं जपले पाहिजे आणि विकसनशील समाज रचनेसाठी कट्टीबंध राहून काम करावे लागेल.मिडीया माध्यमातून स्पर्धा वाढलेली आहे,एखादी बातमी नवा विचार नवी संकल्पना मिळेल या आशेने वाचक बातमी कडे बघतो ती बातमी त्याची पूर्तता करत असेल तर तो खरा पत्रकार असे म्हणता येईल असे मत मांडले.यावेळी आपल्या मनोगतात रविंद्र माने यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत आपले काम अविरतपणे सुरू ठेवले आहे त्याबद्दल कौतुक केले दिलेल्या पुस्तक भेटीचा स्विकार करत पत्रकार म्हणून जी जबाबदारी आहे,ती नक्की पार पाडली जाईल असे मत व्यक्त केले,व्रिकांत पाटील यांनी अंनिसच्या कार्यकर्त्याचे पुस्तक भेट दिल्याबद्दल आभार मानले राहुल कांबळे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन खुप चांगले केले असल्याचे सांगितले.शिवाजी माळी यांनी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या पुस्तक भेटीचा स्विकार करत कामाला शुभेच्छा दिल्या.यावेळी  अजित माने,विनायक कदम,चंद्रकांत गायकवाड,व चॅनल प्रसार माध्यमे संतोष एडके,आबासाहेब चव्हाण,वैभव माळी,अतुल काळे व अंनिसचे कार्यकर्ते पांडुरंग जाधव अविनाश घोडके,शंकर पाटील उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.