प्रतिष्ठा न्यूज

बसगोंडा कबाडे यांना कृष्णा सहोदया कॉम्लेक्सचा सर्वाेत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार

प्रतिष्ठा न्यूज
मिरज प्रतिनिधी : मिरज येथील केंब्रिज इंग्लिश स्कूलचे विद्यार्थीप्रिय मराठी विषयाचे अध्यापक श्री. बसगोंडा कबाडे यांना मिळाला.

श्री. बसगोंडा कबाडे गेली 20 वर्षे केंब्रिज स्कूल स्टेट बोर्ड व सीबीएससी या दोन्ही अभ्यासक्रमासाठी मराठीचे अध्यापन करत आहेत. गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलाचा संयोगिता पाटील आदर्श शिक्षक पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला आहे. शब्दांगण साहित्यिक व सांस्कृतिक व्यासपीठ दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा या संस्थामार्फत चालवल्या जाणा-या साहित्य चळवळीत ते सक्रिय असतात. यावर्षीचा कृष्णा सहोदया कॉम्पलेक्सचा हा पुरस्कार फलटण येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल त्यांचा सर्वत्र गौरव होत आहे.

श्री. कबाडे यांना गुलाबराव पाटील शिक्षण संकुलाचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्र पाटील यांचे प्रोत्साहन व सहकार्य नेहमीच असते, या सन्मानानंतर त्यांनी कौतुक केले.

त्यांना मिळालेल्या या सन्मानाचा केंब्रिज स्कुलने सत्कार स्वरूपी गौरव केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी अधिक्षिका ख्रिस्टिना मार्टीन, प्रशासक रफीक तांबोळी, उपमुख्याध्यापक पद्मा सासनुर, समन्वयक अश्विनी येलकर तसेच शाळेतील अध्यापक वर्ग उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.