प्रतिष्ठा न्यूज

आदर्शवत कानडवाडी गावात नवीन गोष्टींचे नेहमी स्वागतच : सरपंच दिपाली शेगुणशे

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात साजरा केला जातो. योगासनांमुळे शारीरिक तसंच मानसिक आरोग्य देखील चांगलं राखण्यासाठी मदत होते. त्यामुळेच सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी कोरोनानंतर योगसनं करण्याकडे सर्वांचा कल वाढलेला दिसून येतो.
या योग दिनाचे औचित्य साधून कानडवाडी ग्रामपंचायत व एमटीडीके पब्लिक स्कूल मालगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी पावनसागर संस्कार भवन कानडवाडी ता. मिरज जि. सांगली येथे आंतराष्ट्रीय योग शिक्षक श्री चेतन जी यांनी योगाभ्यासासोबत सर्व आजार, व्याधी, रोग समुळ निदान होण्यासाठी आयुर्वेद शास्त्राचे मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी शैक्षणिक संकुलाच्या सीईओ स्वाती खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.यावेळी सरपंच दीपाली शेगुणशे, स्कूलच्या मुख्याध्यपिका सुप्रिया पाटील, ग्रामपंचायत सदस्य पूजा खोत, नम्रता कांबळे, पोलीस पाटील प्रमोद कांबळे, जीन मंदिर कमिटी सदस्य धनपाल खोत, वीर महिला मंडळ सदस्य पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.