प्रतिष्ठा न्यूज

इन्व्हेस्टमेंटच्या नावाने चालू असलेल्या बोगस कंपनीज विरोधात पोलिस अधिक्षक मा.डॉ.बसवराज तेली यांना शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : आज शेअर मार्केटिंग इनवेस्टमेंटच्या नावाने चालू असलेल्या बोगस कंपनीज विरोधात सांगलीचे नूतन पोलिस अधिक्षक मा.डॉ.बसवराज तेली साहेब व अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबूले मॅडम यांची भेट घेऊन या संदर्भातील माहिती देऊन निवेदन दिलेजिल्ह्यातील अशा सर्वच कंपन्यांची यादी त्यांच्याकडे दिली. या संदर्भात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मार्फत आजपर्यंत केलेल्या पाठ पुराव्याची त्यांना माहिती दिली.
तसेच, आर्थिक गुन्हे शाखेमधे स्टाफ हा खूपच कमी असून या घोटाळ्याची व्याप्ती पाहता आर्थिक गुन्हे शाखेमधील स्टाफ सुध्दा वाढवावा अशी विनंती केली आणि  निवेदनात मांडलेल्या मुद्दयांप्रमाणे सर्व माहिती त्यांना यावेळी दिली.

यासंदर्भात मपोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी  आश्वासन दिले की, सांगली जिल्ह्यातील सर्वच पोलीस स्टेशनमधे अशा प्रकारचे गुन्हे नोंद झाले असतील त्याची माहिती घेऊन याबाबतीत गंभीर दखल घेऊन आणि येत्या ८ दिवसात यासंदर्भातील कारवाई करू.
यावेळी आनंदराव चव्हाण, सुरेंद्रराव ईंगळे, प्रशांत गायकवाड, विनायक खेडेकर, दिगंबर साळुंखे, हर्षद कुंभार व युवा सहकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.