प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या प्रभाग 2 मधील रस्त्याची दुरावस्था नागरिक 5 वर्षापासुन डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव नगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन पुंदी रोड सुयोग बजार जवळील रस्त्याची दुरावस्था झाली आहे.याबाबत येथील नागरिकांनी नगरपालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदन देऊन येथे डांबरी रस्ता करण्यात यावा अशी मागणी केली होती.परंतु याबाबत प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून मुरमीकरण केलेला रस्ता चिखलमय झाला आहे.अंतर्गत गटार कामासाठी खोदलेला रस्ता जशाचा तसा मुरमीकरण न करता सोडण्यात आल्याची तक्रार येथील नागरिक करत आहेत.सध्या पावसामुळे चिखलमय झालेल्या रस्त्यामुळे लहान मुले स्त्रिया वयोवृद्ध लोकांना बाहेर पडणे मुश्किल झाले आहे,तसेच चिखलामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे.काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहत आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी नगरपालिका प्रशासनाने याबाबत योग्य तो निर्णय घेऊन लवकरात लवकर रस्त्याचा प्रश्न मिटवावा अशी मागणी येथील नागरिकांच्यातून होत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.