प्रतिष्ठा न्यूज

बुधगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा क्यूआर कोडचा शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : बुधगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा क्यूआर कोडचा शुभारंभ सांगली अर्बन बँकेचे चेअरमन गणेशकाका गाडगीळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
यावेळी बँकेचे संचालक संजय धामणगावकर, एच वाय पाटील, रवींद्र भाकरे, सतीश मालू व ग्रामपंचायतीच्या सरपंच वैशालीताई पाटील, उपसरपंच अविनाश शिंदे सदस्य मनोहर पाटील, धनाजी पाटील, जयश्री पाटील, शुभांगी कोळी , शुभांगी शिंदे, शुभम कांबळे मिरज पंचायत समितीचे माजी उपसभापती विक्रम पाटील, जिल्ला उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, जयवंत पाटील, सयाजी कदम, विवेक लुगडे, रामदास पाटील यांच्यासह गावातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विनायकराव शिंदे यांनी केले तर आभार जयवंत पाटील यांनी मानले आपले विचार मांडताना गणेश काका म्हणाले सध्याचे युग डिजिटल युग आहे आपण दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन पद्धतीचा वापर करीत आहोत देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी नोटबंदी केली त्यानंतर ऑनलाईन सुविधेचा वापर जास्तीत जास्त होऊ लागला यूपीआयच्या माध्यमातून ऑनलाईन व्यवहार नागरिक जास्तीत जास्त करत आहेत ग्रामपंचायतीचा कर जास्तीत जास्त जमा व्हावा त्याचबरोबर गावातील अनेक नागरिक नोकरीच्या निमित्ताने विविध राज्यांमध्ये वास्तव्यास आहेत आर्मीमध्ये असणाऱ्या जवानांना देखील देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून ऑनलाईन पद्धतीने ग्रामपंचायतचा कर भरता येणार आहे त्याचबरोबर व्यवहारात पारदर्शकता येणार आहे भ्रष्टाचार मुक्त ग्रामपंचायत करण्याच्या दृष्टीने एक पाऊल या माध्यमातून उचलले गेले आहे सदर योजनेचे गावातील ग्रामस्थांकडून स्वागत होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.