प्रतिष्ठा न्यूज

अस्वच्छतेच्या कारणास्तव मनसेने केलेल्या तक्रारीमुळे प्रशासनाकडून तासगाव येथील हॉटेलचा परवाना रद्द

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव शहरातील हॉटेल राजेश्वरी हे प्रचंड मोठया प्रमाणात अस्वच्छ आहे. हॉटेलमधील कर्मचारी अस्वच्छपणे काम करताना दिसून येतात. शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे हॉटेल मालकाकडून पालन केले जात नाही. हॉटेलमधील किचनला गटारीचे स्वरूप आले आहे. किचन लगतच्या भिंतीजवळ कचऱ्याचे मोठ-मोठे ढिग दिसत आहेत. किचन मध्ये पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी भांडी अस्थावस्थ व जमिनीवर सांडलेल्या खराब पाण्यामध्ये दिसून येतात. हॉटेलमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे अस्वच्छ आहेत.या हॉटेलमध्ये तासगांव शहरातील व तालुक्यातील लोकांचा वावर मोठ्या प्रमाणावर असतो. या हॉटेलमधील अन्नपदार्थ खावून सामान्य नागरिकाच्या जिवितास धोका निर्माण होवू शकतो. असे मनसे कडून तासगांव नगरपालिकचे मुख्य अधिकारी यांना दि. २२/०८/२०२२ रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेल राजेश्वरीचा पंचनामा करून नोटीस बजावली होती. त्यानंतर याबाबत मनसेने अन्न भेसळ विभागाला निवेदन देऊन पुरावे सादर केले होते त्यात त्यांनी प्रशासनाने स्वतः या विषयात लक्ष देवून हॉटेल राजेश्वरीवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करून हॉटेल सील करून हॉटेलचा परवाना रद्द करावा असे म्हंटले होते. त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी श्री.द.ह.कोळी यांनी दि.२१.०९.२०२२ रोजी हॉटेलची तपासणी केली असता त्यांना तपासणीवेळी दोष आढळून आले होते. त्यावेळी त्यांनी तपासणी अहवालाची प्रत हॉटेल चालकास त्याचवेळी दिली होती. त्यानंतर हॉटेल चालकास कार्यालयाचे पत्र जा.क. असुमाका / ११४७/२०२२ दि.०१.११.२०२२ नुसार सुधारणा नोटीस तपासणी अहवालातील मुद्द्यांची पुर्तता करण्यासाठी पाठविण्यात आली होती.सदर सुधारणा नोटीसचे उत्तर हॉटेल मालकाने दि.०९/०२ / २०२३ च्या पत्रानुसार दिलेले होते. त्यामध्ये नोटीसमधील काही मुद्द्यांची पूर्तता केल्याबाबतचे पुरावे जोडण्यात आलेले न्हवते त्यामुळे सदरचे उत्तर समाधानकारक नसल्या मुळे आपणास संधी देवूनही आपण दोषांची पूर्तता करण्यास असमर्थ ठरला आहात असे प्रशासनास दिसून आले असून आपण सर्व दोषांची पूर्तता केलेली नाही. असे निदर्शनास आल्याने आपणास मंजूर करण्यात आलेला अन्न परवाना क ११७१७०४०००१०२६ मुदत दि.०८/०६/२०१४ हा संदर्भीय सुधारणा नोटीसमध्ये नमूद उल्लंघने लक्षात घेवून पदावधीत अधिकारी व सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन, म.राज्य.,सांगली. मला अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ चे कलम ३२ व अन्न सुरक्षा व मानदे नियमन २.५.८ (परवाने व नोंदणी नियमन -२०११) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार सदर परवाना दि.२६/०६ /२०२३ ते दि. २४/०७/२०२३ रोजी (३० दिवस) निलंबीत करण्यात आला आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.