प्रतिष्ठा न्यूज

चोरीस गेलेले ७ लाख ८८ हजार रुपयांचे दागिने तक्रारदार महिलेस परत : विश्रामबाग पोलीसांचे कौतुक

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : विश्रामबाग पोलीस ठाणे गु.र.नं. ५७६/२०२३ भादविसं कलम ४५४,३८०,३४ नुसार गुन्हा दि.१३.१०.२०२३ रोजी दाखल होता. सदर गुन्हयामध्ये सोन्याचे दागिने व रोख रक्कम अशी एकुण ७,८८,०००/- रू. मुद्देमाल चोरीस गेला होता. तरी सदर गुन्हयाचा योग्य तपास करून आरोपी यांना अटक करून त्यांचेकडून वरील मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तरी सदर गुन्हयातील फिर्यादी मासुम इरफान जमादार रा. वृंदावन व्हीला बंगला, विधाता कॉलनी, विश्रामबाग, सांगली. यांना सदर गुन्हयातील मुद्देमाल हा त्यांना मा. पोलीस निरीक्षक साो संजय मोरे, पोउनि निवास कांबळे, मपोहेकॉ/ माणिक केरीपाळे यांच्या प्रयत्नातुन लवकर देण्यात आला आहे. तरी फिर्यादी व परिसरातील नागरीकांनी मुद्देमाल लवकर मिळाल्याने पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.