प्रतिष्ठा न्यूज

मारतळा येथे “श्रीराम जन्मोत्सवानिमित्त” अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन

प्रतिष्ठा न्युज/वसंत सिरसाट
उमरा : लोहा तालुक्यातील मारतळा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही “श्रीराम जन्मोत्सवानिमित्त” वै. हभप संभाजी महाराज (मामासाहेब) मारतळेकर यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताहाला सुरूवात झाली असून त्यात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दि.31मार्च 2023 पर्यंत चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात गुरुवर्य- हभप किशन महाराज बरबडेकर, हभप भाऊसाहेब महाराज पावडेवाडीकर व हभप समगीर महाराज नांदगावकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात पहाटे- “काकडा आरती”, सकाळी- “ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण”, दुपारी- “गाथा भजन”, सायंकाळी- “हरिपाठ” व रात्री- “हरि कीर्तन” होणार आहेत. तसेच दि.30 मार्च रोज गुरुवारी सकाळी श्रीराम नवमीनिमित्त हभप किशन महाराज बरबडेकर यांचे “श्रीराम जन्मोत्सवाचे” किर्तन होणार आहे.आणि शेवटच्या दिवशी दि.31मार्च रोज शुक्रवारी सकाळी पालखी मिरवणूक व वारकरी दिंडीची गावातील मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक होणार आहे. त्यानंतर हभप भाऊ महाराज गोसावी पंढरपूरकर यांचे काल्याचे किर्तन- दहीहंडी व महाप्रसाद दिला जाणार आहे.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे समस्त गावकरी मंडळी मारतळा यांनी कळविले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.