प्रतिष्ठा न्यूज

आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टर संकेत सरगर यांच्या कुटुंबाचा महापालिकेकडून सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : राज्य सरकारचा क्रीडा क्षेत्रासाठी मानाचा मानला जाणारा शिवछत्रपती पुरस्कार आंतरराष्ट्रीय वेट लिफ्टर संकेत सरगर याला जाहीर झाल्यानंतर आज महापालिका प्रशासनाकडून संकतच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान महापालिकेचे बजेट प्राप्त होताच संकेत याला महापालिकेने जाहीर केलेली पाच लाखाची मदत सन्मानपूर्वक त्याला दिली जाईल असे यावेळी महापालिकेच्या वतीने अश्वस्त करण्यात आले.
यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, मनपा आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान , सहायक आयुक्त नितीन शिंदे, स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, मनगु सरगर, सचिन सरगर, शहर अभियंता परमेश्वर अलकुडे यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.