प्रतिष्ठा न्यूज

तमाम सांगली करांकडून सर्जा चित्रपटाच्या माध्यमातून अनाथ मुलांना मदत : चंदनदादा चव्हाण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : प्रा. यशवंत गोसावी यांनी सांभाळ केलेल्या १०० च्या वर अनाथ मुलांना तमाम सांगली करा कडून “सर्जा ” मराठी ग्रामीण चित्रपट च्या माध्यमातून जमा होणारा निधी सुपूर्त केला जाणार आहे. त्यासाठी सांगली करानी २८ एप्रिल ते ३ मे पर्यंत रोज सायं.७ वाजता एस एफ सी मॉल मध्ये मुक्ता चित्रमंदिर येथे सुरु होत त्याचे संपूर्ण बुकिंग फुल्ल केले असून ४ मे ची फक्त १०० तिकिटे शिल्लक आहेत.यासाठी सांगली करानी मोठा प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमास पत्रकार बंधूनी बातम्याच्या माध्यमातून हा संदेश सर्वपर्यंत पोहचवला त्यामुळे गेली आठ दिवस सांगली करा कडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.

संपूर्ण महारष्ट्रात धुमाकूळ घातलेला सर्जा हा चित्रपट सांगळीच्या अमीत पाटील या युवकाने निर्माण केला आहे. अनाथ मुलांच्या मदतीसाठी त्यांनी सांगाली करांना विना मोबदला सात दिला आहे. फक्त थिएटर भाडे जाऊन राहणारी रक्कम मा जिल्हाधिकारी सांगली यांच्या हस्ते, तमाम सांगली करांच्या वतीने जमा झालेला निधी अनाथ मुलांच्या संगोपना साठी देण्यात येणार आहे..

सांगालीतील, व्यापारी वर्ग , प्रशासकीय अधिकारी., सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांचा मोठा सहभाग मुळे हा कार्यक्रम पार पडत असून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले आहे त्या सर्वांचे आभार.

गुंठेवारी चळवळीचे जनक
*चंदनदादा चव्हाण*, मोबाईल : 9421245003

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.