प्रतिष्ठा न्यूज

आनंदी फार्मसी मध्ये सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा : आनंदी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आनंदी कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘सेवा पंधरवडा: राष्ट्रानेता ते राष्ट्रपिता ‘ यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंती पर्यंत चा सप्ताह शासनामार्फत पंधरवडयाचे आयोजन करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवड्याचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रा. सतीश देसाई व सचिव डॉ. विद्या देसाई यांनी केले. हा सेवा पंधरवड्याची सुरवात महाविद्यालय परिसरातील स्वच्छ्ता, महाविद्यालय आवारात वृक्षारोपण यां कार्यक्रमाच्या आयोजनाने करण्यात आली. या सेवा पंधरवड्या दरम्यान मतदार जागृती, औषधांचा सुयोग्य वापर, रक्त गट तपासणी शिबिर, चित्रफित स्पर्धा, फार्मसी मधल्या विविध स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन अश्या वेग वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे आयोजले आहे. सेवापंधरवडा उद्घाटन प्रसंगी प्राचार्य. डॉ. सचिन पिशविकर, उपप्राचार्य. डॉ. राहुल अडणाईक, एन.एस.एस. चे समन्वयक सुजित साळोखे, शिक्षण व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.