पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात शैक्षणिक धोरणावर व्याख्यान
प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह निमित्त आनंदी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ आर एस आडनाइक यांचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २० २० या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळेस त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना होणारे लाभ, शैक्षणिक संस्थांमध्ये होणारे बदल याविषयी सखोल मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव व प्रभारी प्राचार्य डॉ व्ही एस पाटील होत्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक नॅक समन्वयक डॉ. एस.एस. पानारी यांनी केले, प्रा ए एस कांबळे यांनी आभार मानले प्रा. ए एस जमादार यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास संस्था अध्यक्ष प्रा सतीश देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळेस प्रा डी के पाटील ,प्रा एच एस फरास, प्रा घाटगे एस एस, प्रा.सरनोबत आर आर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.