प्रतिष्ठा न्यूज

अमर बलिदान दिनानिमित्त नांदेडचे 500 देशभक्त शहीद भगतसिंग यांच्या गावी रवाना

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी देशासाठी त्यांच्या प्राणांची आहुती दिली ते दिवस म्हणजे 24 मार्च रोजी पंजाब येथील शहीद भगतसिंग यांच्या गावी खटकर कला येथे साजरा होणार असून नांदेड येथील 500 देशभक्त संचखंड एक्सप्रेसने पंजाब कडे रवाना झाले आहेत. मल्लीनाथ महाराज यांच्या जयभारत माता सेवा समिती च्या वतीने गुलबर्गा येथून देशभक्ती पर प्रबोधन करत ही रॅली दि.22 मार्च 2023 रोजी पंजाब येथील शहीद भगतसिंग यांच्या गावी खटकर कला येथे पोहोचून या ठिकाणी दि.23 मार्च रोजी “अमर बलिदान” दिवसाचा कार्यक्रम होणार असून यात माजी न्यायमूर्ती परमज्योतसिंह चाहेल, रणजितसिंह चिरागीया, रणजितसिंह कामठेकर, नवणालसिंह जहागीरदार, दासराव हंबर्डे, नातेवाड गुरूजी, शहाजी लोहार यांच्या सह सुमारे पाचशे देशभक्त आज रवाना झाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.