प्रतिष्ठा न्यूज

जुनी पेन्शन लागू करणार असाल तर राज्यातील पदवीधर बेरोजगारांना नोकऱ्याही द्या : सांगलीत पदवीधर बेरोजगारांची सरकारकडे मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जुनी पेन्शन लागू करणार असाल तर राज्यातील पदवीधर बेरोजगारांना नोकऱ्याही द्या अशी मागणी करत सांगलीमध्ये पदवीधर बेरोजगार नोकरी हक्क समितीकडून निदर्शने करीत सरकारचे लक्ष वेधले. यावेळी निदर्शनात सहभागी झालेल्या पदवीधर बेरोजगारांनी बेरोजगारांच्या हाताला काम द्या पदवीधर बेरोजगारांना शासकीय सेवा प्रदान करा आणि राज्यांमध्ये बंदी असणाऱ्या शासकीय कार्यालयातील नोकर भरती तातडीने सुरू करावी याचबरोबर वर्षानुवर्ष बदली कंत्राटी मानधन तत्वावर काम करणाऱ्या महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांना विनाअट सेवेत कायम करावे अशी जोरदार मागणी केली. तसेच जर बेरोजगारांच्या आणि पदवीधरांच्या प्रश्नाला सरकारने बदल देत दुर्लक्ष केले तर मात्र राज्यभर पदवीधर बेरोजगार हे आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरतील असा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात विकास सूर्यवंशी, दीपक चव्हाण, दत्ता भोसले, सादिक शेख, अभिजित शिंदे आदींसह बेरोजगार सहभागी झाले होते. यावेळी अप्पर तहसीलदार कार्यालयाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.