प्रतिष्ठा न्यूज

राजर्षी छ. शाहू महाराजांनी नवनवीन कल्पना अमलात आणल्या – बाळासाहेब पाटील; विटा शहर काँग्रेस सेवादला तर्फे शाहू जयंती साजरी

प्रतिष्ठा न्यूज
विटा प्रतिनिधी : येथील बाळासाहेब नामदेव पाटील मित्र मंडळ आणि विटा शहर काँग्रेस सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना सेवादल अध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले छ. शाहू महाराज यांनी नवनवीन कल्पना अमलात आणल्या. त्यामधे प्रामुख्याने शाहू मिल, राधानगरी धरण , मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बोर्डिंग सारख्या त्याकाळातील व्यवस्थांचा उल्लेख करावा लागेल.
कार्यक्रमा दरम्यान छ. शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस सेवादल महिला अध्यक्षा शैलजा भिंगारदेवे, उमेश जंगम, विवेक जोग, गजानन चोथे, दत्ता जगदाळे तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.