प्रतिष्ठा न्यूज

शिवगर्जना’ नाट्य पाहण्यासाठी हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद :छत्रपती शिवाजी महाराज की जय!!! जयघोषात नाटकाचा थाटात शुभारंभ

प्रतिष्ठा न्यूज
नांदेड : राज्याच्या सांस्कृतिक संचालनालय, आणि जिल्हा परिषद नांदेड च्या वतीने “शिवगर्जना ” नाट्य पाहण्यासाठी हजारो लोकांची अलोट गर्दी उसळली असून नाट्य पाहण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चांच्या जीवन चरित्रावर आधारित शिवगर्जना या महानाट्धाचा दि.9मार्च पासून नादेडच्या गुरुद्वारा मैदानावर छत्रपतींच्या जयघोषात थाटात शुभारंभ झाला, २५० पेक्षा अधिक कलाकमांचे समर्पित सादरीकरण आणि हजारो रसिक प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद अशी तीन तासांची मैफल मैदानावर रंगली.

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय व नांदेड जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाचा आधारित महानाट्य शिवगर्जनाचा प्रयोग होत आहे. ९, १० व ११ असे तीन दिवस गुरुद्वारा मैदान, हिंगोली गेट ,रेल्वे हॉस्पिटल समोर, दररोज ठिक सायंकाळी ६:३० वाजता महानाट्याच्या प्रयोगाची सुरुवात झाली आहे.
सतत दोन दिवस म्हणजे दि.१० मार्च आणि दि.11 मार्च रोजी प्रयोगाला

सायंकाळी ठिक ६.३० ला सुरू होणार आहे. प्रत्येक कुटुंबाने या महानाट्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
या नाटकाचे उद्घाटन शिवसेना आमदार आ. बालाजी कल्याणकर, आ. राजेश पवार, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांच्यासह विविध मान्यवरांनी हस्ते सायंकाळी ७ वाजता या महानाट्याची सुरुवात केली. त्या काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील परिस्थिती, संस्कृती, लोककला, परकिय आणि परिस्थिती, लोकनाट्य, पुढे प्रसंगाचे युध्दाचे प्रसंग चित्तथरारक असे होते. पोवाडे यांमुळे वास्तव्य परिस्थिती निर्माण झाली होती. कुंटुबांनी सह परिवार पाहावे असे नाट्य आहे.
छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्राची परिस्थिती, आक्रमणात पोळलेला महाराष्ट्र छत्रपतीचा उदय होतानाची त्याकाळातील संस्कृती, लोककला याची गुंफण करीत छत्रपतीच्या आयुष्यातील चित्तथरारक लक्षवेधी सादरीकरण, ओघवते ध्वनी व प्रकाश व्यबस्था रसिकांना हे महानाट्य खिळवून ठेवते. छत्रपती शिवाजी महाराजांची आग्रा भेट , युद्ध निती, तानाजी मालुसरे, जिवाजी महाला, बाजी प्रभू देशपांडे यांचा पराक्रमाची माहिती मिळाली.
घोड्यावरून मावळ्यांसह मैदानावरची लाईव्ह रपेट, पोड्यावरची चार मजली सेटवरची हृदयाचा ठोका चुकवणारी एन्ट्री, युद्धत्वे प्रसंग चित्तथरारक होते. सलग तीन तास कोणताही मध्यांतर न घेता हा प्रयोग रसिकांना आकर्षित करून ठेवते. प्रत्येक कुटुंबाने बघावा असा हा नाट्यप्रयोग ज्या रविवारी व सोमवारी होणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.