प्रतिष्ठा न्यूज

महात्मा बसवाण्णा जयंती निमित्त राष्ट्रीय लिंगायत संघातर्फे रविवारी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन : प्रदीप वाले यांची माहिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जगदज्योती महात्मा बसवण्णा जयंतीनिमित्त राष्ट्रीय लिंगायत संघाच्या वतीने लिंगायत बसवरत्न गौरव पुरस्कार व सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन सांगली येथे रविवार दि. १६ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. अशी माहिती संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपबापू वाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रदीप वाले म्हणाले, जगाला शांतीचा संदेश देणार्‍या जगदज्योती महात्मा बसवण्णा यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजातील गुणवंतांचा लिंगायत बसवरत्न गौरव पुरस्काराने सन्मान करणार आहोत. तसेच विविध मान्यवरांचा सत्कारही करणार आहोत. हा सोहळा रविवारी सांगली येथील लिंगायत माळी मंगल कार्यालय लक्ष्मी देवळाजवळ येथे सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत चालणार आहे. कामगार मंत्री व सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत तर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे हे प्रमुख पाहुणे आहेत. लायन्स क्लबचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर राजशेखर कापसे, रिलायंस एज्युकेशन लातुरचे उमाकांत होणराव, कोल्हापूर येथील राणी चन्नम्मा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजश्री सावर्डेकर, नांदेड येथल आनंद कर्णे, विटा येथील ज्येष्ठ समाजसेवक गंगाधर (आप्पा) लकडे यांच्यासह जत तालुक्यातील राष्ट्रीय बसवल खोजानवाडी या संस्थेला बसवरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.
पत्रकार परिषदेस राष्ट्रीय लिंगायत संघाचे समन्वयक संजय हिरेकर, जीनगोंडा डोर्लीकर, देवानंद जबंगी, कैलास स्वामी, रविंद्र बुकटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.