प्रतिष्ठा न्यूज

विशाळगडावरील अतिक्रमणा विरोधात गुरुवार दि. 13 रोजी सांगलीतून रणशिंग फुंकणार- माजी आमदार नितीन शिंदे

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे आणि कित्येक शुर मावळ्यांच्या बलीदानाने पावन झालेल्या श्री विशाळगडावर इस्लामी धर्माधांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून संपूर्ण गड विद्रूप केला आहे .
प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाच्या थडग्याभोवतीचे अतिक्रमण श्री शिवप्रतापभूमी मुक्ती आंदोलनाच्या प्रखर विरोधाने जमीनदोस्त करण्यात आले .त्याच पद्धतीने विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमण उध्वस्त करण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथी दिना दिवशी म्हणजेच गुरुवार दि. 13 जुलै २०२३ रोजी सकाळी 10.30 वाजता लो. टिळक स्मारक मंदिर सांगली येथे सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने विशाळगडावरील अतिक्रमणा विरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकण्यात येणार आहे.
यासाठी एक व्यापक बैठक घेण्यात आली. यावेळी भा.ज.पा.,शिवसेना, हिंदू एकता आंदोलन, श्री शिवप्रतिष्ठान, विश्व हिंदू परिषद ,मावळा प्रतिष्ठान, बजरंग दल, रा. स्व. संघ,आणि इतर हिंदूत्ववादी, शिवप्रेमी पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक केदार खाडीलकर यांनी केले. यावेळी हणमंत पवार, संजय जाधव, अंकुश जाधव, प्रकाश चव्हाण, अमित सूर्यवंशी, ऋषिकेश पाटील, अमर चित्रे, रामभाऊ सूर्यवंशी, अजय काकडे, संतोष माळी, रमेश दमाळ आधी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.