प्रतिष्ठा न्यूज

बेडगच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये भरघोस यश

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : आर्य अबॅकस आणि वेदिक मॅथ्स असोसिएशन यांच्यातर्फे सोमवार दि. 10 जुलै 2023 रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये बेडगमधील पियुष क्लासेसच्या 23 मुलांनी भाग घेतला यामधील 14 विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले व इतर मुलांना प्रमाणपत्र व मेडल मिळाले. यामध्ये बेसिक अबॅकस लेवल मध्ये, मोठ्या गटात अमृता कुंभार द्वितीय, सानिका कुंभार तृतीय, मध्यम गटात ओंकार सत्ती द्वितीय, माधवानंद आवटी तृतीय, लहान गटात यशिका कोळी चौथी, मास्टर ज्युनिअर लेव्हल गटात असद मुल्ला प्रथम, पार्थ शेट्टी तृतीय आला.
अबॅकस लेव्हल 1 गटात वेदांत मुळे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन व अभिराज आवटी तृतीय, लेवल 2 गटात प्राची वनवे पाचवी, लेव्हल 3 गटात विराट निलेश घोरपडे प्रथम, आर्या निलेश घोरपडे द्वितीय, चिन्मय पाटील चौथा, मानसी दत्तात्रय पाटील पाचवी आली.  संस्थेच्या शाखा अधिकारी सौ. रंजना विजय सूर्यवंशी यांना जुलै 2023 चा बेस्ट टीचर अवॉर्ड ने सन्मानित केले गेले. संस्थेच्या वैष्णवी मॅडम, ऐश्वर्या मॅडम व आकांक्षा मॅडम यांचेही मार्गदर्शन मुलांना चांगल्या पद्धतीने मिळाले. मुलांनी स्पर्धा परीक्षेचा अनुभव घेऊन स्वतःला सिद्ध करावे.  अॅबॅकसचे विद्यार्थी कॅल्क्युलेटर, कॉपी किंवा पेनशिवाय गणिताचे प्रश्न सोडवू शकतात, जी भीती गणिताचा अभ्यास करण्यापासून रोखत होती ती कायमची नाहीशी होते. स्मरणशक्ती आणि मानसिक क्रियाकलाप सुधारते, अॅबॅकस मुलांना नंतरच्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी देखील खूप उपयुक्त आहे. असे सौ. रंजना सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले व विद्यार्थी, पालकांचे खूप खूप अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.