प्रतिष्ठा न्यूज

खासदार राहूल गांधींच्या शिक्षेला सुप्रिम कोर्टाची स्थगिती : सांगली शहर जिल्हा काँग्रेसने केला जल्लोष साजरा

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. ४: सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे नेते खासदार राहूल गांधी यांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सूरत न्यायालयाने राहूल गांधी यांना दिलेल्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे सांगली शहर जिल्हा काँग्रेसने आज काँग्रेस भवन सांगली परिसरात झेंडे घेऊन,नागरिकांना साखर वाटून व फटाके फोडून आनंद साजरा करुन जल्लोष केला. जिंदाबाद-जिंदाबाद.. राहूल गांधी जिंदाबाद, नफरत छोडो.. भारत जोडो.. काँग्रेस पक्षाचा विजय असो.. संविधानाचा विजय असो, नफरत के बाजार में.. मोहब्बत की दुकान खुल गयी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
माध्यमाशी बोलताना शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, ‘ सुप्रिम कोर्टाच्या या निर्णयामुळे राहूल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल झाली आहे व इंडीयाचे पुन्हा संसदेत कमबॅक झाले आहे. भारतीय संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्याने सत्याचा, संविधानाचा व प्रेमाचा विजय झाला आहे. जोपर्यंत अंतीम निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत शिक्षेला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने गंभीर प्रश्न उपस्थित करताना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचे कोणतेच कारण दिसत नाही अशी टिप्पणी केली आहे. शेवटी सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया दिली.

या वेळी बिपीन कदम माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करुन मोदी सरकारने हुकूमशाही दाखवली होती त्यास न्यायालयाने चपराक लगवली आहे व लोकशाही पुन्हा एकदा बळकट केली आहे.
या वेळी नगरसेवक मयूर पाटील, तोफिक शिकलगार, सनी धोत्रे, रवींद्र खराडे, एन. डी. बिरनाळे , ताजुदिन शेख, वसीम रोहिले, अमित पारेकर, अल्ताफ पेंढारी, अजित बोरकर, अमर निंबाळकर, चेतन पाटील, अमित बस्तवडे, उत्तम सूर्यवंशी, याकूब मणेर, आशिष चौधरी, नामदेव पठाडे, प्रताप पाटील, अरुण पडसुळे, प्रतीक्षा काळे, शमशाद नायकवडी, सीमा कुलकर्णी, विठ्ठलराव काळे, श्रीधर बारटक्के, सिद्धार्थ माने, देशभूषण पाटील, सचिन चव्हाण, योगेश पाटील, विश्वासराव यादव, शिवाजी सावंत, गौतम निरंजन व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.